Thursday, September 2, 2010

तावलीचा ट्रेक...


तावलीचा ट्रेक...
रविवारचा सुट्टीचा दिवस निसार्गाच्या सानिध्यात घालवायचा म्हणून विचार करत होतो पण कुठे जायचे हे नक्की होत नव्हते. शुक्रवारी प्रियाने वैभव ला फोन करून सांगितले कि आम्ही रविवारी तावलीच्या ट्रेक ला जाणारा आहोत येशील का..? नाही म्हणायची शक्यताच नव्हती वैभव ने मला फोन करून सांगून टाकले कि आपल्याला रविवारी तावली म्हणून बदलापूर जवळ एक डोंगर आहे तिथे ट्रेकिंग ला जायचे आहे. ठरले तर मग रविवारी सकाळी ६ वाजेला डोंबिवली स्टेशन वर भेटायचे. शनिवारी संध्याकाळीच मी bag भरून तैय्यार होतो. सकाळी ५:१५ मी नाहूर स्टेशन ला आलो वैभव ला यायला थोडा उशीर झाला बिचार्याला ऐरोली वरून कुठलीच गाडी नव्हती म्हणून तो पायीच निघाला नाहूर ला यायला, अर्ध्या रस्त्यात त्याला सुदैवाने एका काकांनी लिफ्ट दिली आणि ५:५५ ला तो नाहूर ला आला. आम्हाला थोडा उशीरच झाला पण असो काय करणार..तर आम्ही ६:२५ ला डोंबिवली स्टेशनला पोहोचलो तसा प्रिया ला फोन केला ती स्टेशन जवळच होती लगेच आली पण ती एकटीच होती आम्हाला वाटलं निघून गेली कि काय सर्व झन पण तिने आम्हाला सांगितल कि तिथे जवळच स्वामी विवेकानंद म्हणून एक शाळा आहे तिथे सर्व झन जमलेली आहेत. प्रियाचा आज वाढदिवस होता तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या चहा पाज म्हटलो तर म्हणते कशी अरे उशीर होतोय चला लवकर :( पण आम्ही कसले ऐकतोय १ १ कट मारलाच पण बिल मात्र आम्हीच दिले म्हटलं थांब पार्टी घेतल्या शिवाय सोडणारच नाही तुला मग काय इथूनच तिला पिडायला सुरुवात केली. आम्ही शाळेजवळ पोहोचलो तेव्हा एक मुलीने आमचे नाव आणि मोबाईल नंबर घेतले. तेव्हा प्रियाने सांगिले कि त्यांचे एक सर आहेत हेमंत कारखानीस म्हणून ते नेहमी हा ट्रेक organize करतात सर्वां साठी प्रवेश खुला असतो. एक फी म्हणून ते प्रत्येकी ६० रुपये घेतात.त्यात येणा जाण्याचा खर्च सकाळचा चहा आणि नाश्ता असतो(जेवण आपल्यालाच न्यावे लागते ;) ) बरेच झन ग्रुप करून येतात.आमच्या ग्रुप मध्ये सर्व प्रियाचे मित्र मैत्रिणी होते आमची कोणाशीच ओळख नव्हती प्रियाने सर्वांशी आमची ओळख करून दिली.आमच्या ग्रुप मध्ये आम्ही एकूण आठ झन होतो (प्रिया , सोनी, रुपाली, हर्शल, अभी, अविनाश , वैभव आणि मी ) बघता बघता ३० ते ३५ झन जमा झाले. मग बरोबर ७:१५ ला आम्ही डोंबिवली स्टेशन ला आलो तिथून आम्ही सर्वांनी बदलापूर लोकल पकडली आणि ७:५० आम्ही बदलापूर स्टेशन ला पोहोचलो. ट्रेन मध्ये आमच्या ग्रुप बरोबर आमची चागलीच गट्टी जमली. स्टेशन ला आल्यावर बदलापूर पूर्व वरून आम्हाला बस मिळणार होती. बस स्टॉप जवळच एक छोटेसे हॉटेल होते सर्वांनी मस्त गरम चहा मारला. मग वाशी स्टेशन ला जाणारी एक बस पकडली आणि १५ मिनिटातच आम्ही चिखलोली म्हणून स्टॉप वर पोहोचलो. तिथूनच १५ मिनिटांच्या अंतरावर छान नदी वाहत होती आणि छोटेसे धरणं होते. पाणी बघितल्यावर मग काय ब्यागा टाकल्या आणि सरळ निघालो भिजायला. अतिशय सुंदर वातावरण होत.मनसोक्त पाण्यात उड्या मारल्या, खूप खेळलो. मग इडलीचा नाश्ता केला आणि पुढच्या तावली ट्रेक ला सुरुवात केली. एवढ्या छान निसर्गरम्य ठिकाणीही काही कारखाने प्रदूषण करत होते निदान अशा ठिकाणी तरी ह्या कारखान्यांना परवानगी देऊ नये असो. तर मग थोडे दूर चालत गेल्या वर एक नदी लागली आणि समजलं कि ह्या नदीतूनच वाट काढत पुढे जायचे आहे. मग काय अजूनच मजा पुन्हा भिजायला भेटणार. मस्त पैकी एकमेकांना support करत आम्ही चालू लागलो.मध्ये मध्ये बरेच झन गोल करत होते मीही २ वेळेस गोल केले पण बर खूप काही लागले नाही. जवळ जवळ 7 ते ८ किलोमीटरची ती नदी पार केल्यानंतर आम्ही एक पायवाट धरली आणि पुढे डोंगर चढू लागलो. अतिशय दाट झाडी होती आणि फक्त एक फुट रुंद अशी ती पाय वाट होती. अर्धा तास त्या पाय वाटेवरून चालल्या नंतर आम्ही वर पोहोचलो अतिशय सुंदर असा धबधबा आम्हाला दिसला. सर्व झन दमले होते आणि पोटात कावळ्यांची गिधाडं झाली होती. मग आम्ही सर्वांनी खादाडी केली. मग हेमंत सरांनी सांगितले कि सर्वांच्या ब्यागा एकाच जागी ठेऊन मनसोक्त भटका. आमच्या कडे अजून दोन तास होते. तसे आम्ही तिथे फोटो सेशन केले. पाण्यात खूप उड्या मारल्या पुन्हा मनसोक्त पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला.मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो सर्वे झन बर्या पैकी दमले होते.डोंगर उतरतांना आम्हालामागील बाजूने उतरावे लागणार होते. डोंगर उतरायला आम्हाला १ ते १:३० तास लागला त्यावेळेत प्रियाला पार्टी बद्दल जाम पिडले मजा आली.डोंगर उतरल्यावर आम्ही एका गावात उतरलो. तसेच आम्ही पुढे चालत राहिलो सर्वच ग्रुप्स विखुरले गेले होते. बरेच चालून झाल्यावर आम्हाला कळले कि आम्ही रस्ता चुकलो आहोत. मग आम्ही एका हॉटेल मध्ये चहा घेतला आणि हेमंत सरांना फोन केला सर आणि सर्व झन बरेच पुढे निघून गेले होते जातांना आम्हाला अंबरनाथ स्टेशन ला जायचे होते.सरांनी सर्वांना पुढे पाठउन ते आमची वाट पाहत पुढे थांबले होते आम्ही पोहोचल्यावर सर आमच्यावर थोडे रागावले पण लगेच सरांचा मूड ठीक झाला तसे आम्ही रिक्षा पकडून अंबरनाथ स्टेशन ला पोहोचलो सर्व आमची तिथे वाट बघत होते.मग तिथून सर्वांचा निरोप घेतला आणि ट्रेन पकडून घरी......
पाण्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर हा तावलीचा ट्रेक एकदा तरी करायला हवा ....
काही क्षण..


6 comments:

 1. Nice Location! and nice post also!!

  Keep trekking !!!

  ReplyDelete
 2. लय भारी सागरा!

  ReplyDelete
 3. मस्त..जागा मस्तच आहे आवडली..
  भेटूच एका ट्रेकला लवकरच :)

  ReplyDelete
 4. नक्कीच सुहास भेटू लवकरच नवीन ट्रेक ला... :)

  ReplyDelete