Wednesday, May 12, 2010

मराठी कोणाची ...?

नेहमी प्रमाणे ६:३० ला ऑफिस सोडले तसेच थोडे पायी चालत मित्रांशी गप्पा मारत मारत L & T पर्यंत आलो. L & T च्या stop पासून आम्हाला मुलुंड जाणारी बस पकडावी लागते तसे आम्ही सर्व झण सज्ज झालो (अहो सज्ज म्हणजे बस तुडुंब भरून येतात मग तीच्यात चढायची शर्यत लागते मग व्यवस्थित चढता यावे म्हणून पाठी ला अडकवलेली bag पुढे अटकवने poket bag मध्ये ठेवणे वैगरे तर असो) आम्ही सर्व झण बस ची वाट बघत होतो तश्या दोन तीन बस सोडल्या पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती.
मग एक बस आली तसे आम्ही सर्व झण त्या बस वर तुटून पडलो सर्वांना जागा मिळाली पाय ठेवायला मीही दारात उभो होतो नेहमीच्या सवयी प्रमाणे "ए भाई आगे चलो, ए चला रे पुढ" असे ओरडत ओरडत जागा मिळवायचा प्रयत्न करू लागलो आणि नेहमी प्रमाणे खिदळत होतो.
तसे एक गृहस्त conductor च्या shit वर बसलेले होते त्यांनी आमच्या कडे वळुन बघितले आणि पुटपुटले कि " मराठी येत नाही तर बोलतात कशाला " हे माझ्या कानावर पडलं च्यायला सांगतो असं डोक फिरलं होत म्हणून सांगू पण त्यांच्या वयाचा मान राखून मी त्यांना म्हणालो कि अहो काका (जरा जड भाषेतच) "आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक शहराची गावांची आणि खेड्यांची मराठी बोलण्याची पद्धत वेगळी आहे म्हणून काय तुम्ही त्यांना मराठी बोलता येत नाही असे कसकाय म्हणू शकतात." तर यावर ते म्हणाले कि "ते आम्हाला माहित आहे पण तुम्हाला मराठी बोलता येत नाही" आता तर खरच खूप चीड आली त्या माणसाची आणि सरळ त्याला म्हणालो "मी ह्या महाराष्ट्र च्या मातीत जन्माला आलो आहे आणि आम्ही अशीच मराठी बोलतो तुम्हाला काय मराठी बोलण्याचा सरकारने परवाना दिला आहे का ..?" तसा तो माणूस मला चिडून म्हणाला कि "जास्त बोलू नकोस" मग मीही काही गप्प बसणार नव्हतो त्याला म्हणालो कि "आमच्या गावाकडच अन्न गोड लागत तुम्हाला आणि आमची भाषा चालत नाही तुम्हाला" तसा तो माणूस काही तरी बडबडतच राहिला माझे मित्रही मला म्हणाले कि "जाऊदे रे कशाला त्याच्या नादी लागतो वेडा दिसतोय तो" मग मीही त्याच्या कडे दुर्लक्ष करणेच पसंद केले.
पण काही केल्या मला त्याने असे बोललेले अजीबात आवडले नाही खूप संताप झाला होता. माझ्या भाषेवर मनापासून प्रेम करणारा मी आणि मला असाच कोणी येऊन तुझी मराठी चुकीची आहे तुम्हाला मराठी बोलण्याचा हक्क नाही असे म्हणतो. खूप चीड चीड झाली माझी. घरी गेलो आणि दोन घास पोटात टाकले आणि झोपी गेलो. हा विचार करून कि पुन्हा तो भेटला आणि काही बड बड ला तर....हम्म्म्म...

Monday, May 10, 2010

पहिल्यांदाच....... :)

नुकताच मराठी ब्लॉगर्स मेळावा मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयात संपन्न झाला बर्याच दिवसांपासून मेळाव्याचा दिवस उगवण्याची वाट बघत होतो.मुख्य आयोजक कांचन ताई, महेंद्र काका आणि रोहन भाऊ ह्यांचे तर मनापासून आभार कारण एक वाचक म्हणून का होईना आयोजकांनीमला उपस्थित राहण्याची संधी दिली. आपण ज्यांचे लिखाण वाचतो त्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटण्याची खूप मनापासून इच्छा असते ती ह्या मेळाव्याला उपस्तीत राहून पूर्ण झाली. तसा मी ब्लॉग अगोदरच बनवलेला होता पण त्यावर काही स्वतःचे लिखाण वैगरे केलेले नव्हते पण ह्या मेळाव्याला उपस्थीत राहिल्या नंतर खरच मनापासून अस वाटायला लागल कि आपलाही असाच एखादा ब्लॉग असावा म्हणून लगेच लिहायला सुरुवात केली. हे माझ्या ब्लॉग वरचे माझे पहिलेच लिखाण
च्यायला जे होईल ते चुकलो तर तुम्ही आहातच कि सांभाळायला.असाच माझाही ब्लॉग वाचत जा आणि प्रतिक्रिया देत राहा.तुम्हा वाचकांचे मनापासून आभार लवकरच येईन तुमच्या भेटीला काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद.