Monday, May 10, 2010

पहिल्यांदाच....... :)

नुकताच मराठी ब्लॉगर्स मेळावा मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयात संपन्न झाला बर्याच दिवसांपासून मेळाव्याचा दिवस उगवण्याची वाट बघत होतो.मुख्य आयोजक कांचन ताई, महेंद्र काका आणि रोहन भाऊ ह्यांचे तर मनापासून आभार कारण एक वाचक म्हणून का होईना आयोजकांनीमला उपस्थित राहण्याची संधी दिली. आपण ज्यांचे लिखाण वाचतो त्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटण्याची खूप मनापासून इच्छा असते ती ह्या मेळाव्याला उपस्तीत राहून पूर्ण झाली. तसा मी ब्लॉग अगोदरच बनवलेला होता पण त्यावर काही स्वतःचे लिखाण वैगरे केलेले नव्हते पण ह्या मेळाव्याला उपस्थीत राहिल्या नंतर खरच मनापासून अस वाटायला लागल कि आपलाही असाच एखादा ब्लॉग असावा म्हणून लगेच लिहायला सुरुवात केली. हे माझ्या ब्लॉग वरचे माझे पहिलेच लिखाण
च्यायला जे होईल ते चुकलो तर तुम्ही आहातच कि सांभाळायला.असाच माझाही ब्लॉग वाचत जा आणि प्रतिक्रिया देत राहा.तुम्हा वाचकांचे मनापासून आभार लवकरच येईन तुमच्या भेटीला काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद.

5 comments:

 1. सागर, ब्लॉगविश्वात स्वागत.. आता नवीन पोस्ट्स येउदेत.. :)

  पुढच्या मेळाव्याला भेटूच.

  ReplyDelete
 2. धन्यवाद हेरंब , ब्लॉगर्स मेळाव्याला उपस्थित राहून असं वाटल कि इथे कोणीच अनोळखी नाहीये सर्व एकमेकांना अगदी जवळून ओळखत होत जणू काही आपण सर्व एका मोठ्या कुटुंबातले नातलग आहोत.
  पुढच्या मेळाव्याला नक्की भेटू.

  ReplyDelete
 3. सागर
  शुभेच्छा आणि ब्लॉगच्या दुनियेत स्वागत.

  ReplyDelete
 4. अरे सागरा तुझ्या हॉटेल सुरु करण्याची धडपड, जिद्द येऊ देत की शब्दात इथे...आम्हाला पण मदत होईल :)

  ReplyDelete